file photo 
नागपूर

भाऊ, दारू सुरू झाली; चहाचे बी दुकान उघडन का?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : 'माह्या घरी माई बायको, मी, पोरगी आन बुढा-बुढी बी संगच रायते. घरामध मी यकटाच कमावनारा. जे काई थोडंफार खातो ते चहाटपरीच्या भरोशावर. पन भाऊ तीन महिने झाले चहाच दुकान बंद करून. काम कोनत करावं आन कस खावं या विचारामुडे मन खचू रायल. का वाट्टे भाऊ, दारूचे दुकान उघडू रायले, मंग चहाटपरीबी उघडन का?' हा केविलवाणा स्वरातील प्रश्न आहे तो रामदासपेठेतील चहाविक्रेता मनोज सेलोकार यांचा. 

लॉकडाउनमुळे चहाचे दुकान दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यातच लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये चहाटपरी उघडण्याची परवानगी न मिळाल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता चहाचे दुकान कधी उघडेल याचा अंदाज नाही. चहा, तर्री पोहा आणि नागपूरकर यांचे अतूट नाते आहे. नुकतेच ब्रॅंडेड चहाची दुकाने शहरामध्ये सुरू झाली आहेत. मात्र, वर्षानुवर्षे टपरीवर चहा विकणाऱ्यांची आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच आहे. सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी चहाविक्रेते करत आहेत. 

सिव्हिल लाइन, धंतोली, रामदासपेठ, धरमपेठ अशा विविध परिसरामध्ये शे-दोनशे चहाटपरी आहेत. लॉकडाउनमध्ये चहा व्यवसायाला अद्याप सूट न मिळाल्याने हे चहाटपरीवाले संकटात सापडले आहेत. 
यातील अनेक व्यावसायिकांनी चहाच्या वेगवेगळ्या शाखा उघडल्या आहेत. तर, अनेक परप्रांतीय चहाविक्रेते यावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. पावसाळ्यातही चहा विक्रीवर कोरोनाचा प्रभाव राहील, असा अंदाज चहा व्यवसायिकांनी व्यक्त केला. 
 

गेल्या तीन महिन्यांपासून माझे दुकान बंद आहे. या दरम्यान इतर काम शोधायचा प्रयत्न केला. मात्र, अशा परिस्थितीमध्ये तेही मिळाले नाही. काही कामांना विशेष प्रशिक्षण लागत असल्याने ते करणे शक्‍य नाही. त्यामुळे, कुटुंबीयांचे पोट कसे भरावे हा प्रश्न आहे. या सर्व विचारांमुळे मानसिकरीत्या खचलो आहे. 
-मनोज सेलोकार, चहाविक्रेता, रामदासपेठ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT